नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल या ब्लॉग वर तुमचे सहर्ष स्वागत . या पोस्ट मध्ये मी सांगणार आहे की , BHIM अँप कसे ओपन करावे. व दुसऱ्याच्या बँक मध्ये पैसे कसे ट्रान्स्फर करावे .




नोटबंदी झाल्यानंतर मोबाईल द्वारे व्यवहार करणे यामध्ये खूप प्रमाणात वाढ झाली आहे व भारत सरकारचा हाच एक प्रयत्न होता की , भारत हा Cashless व्हावा .त्यामुळेच BHIM अँप्लिकेशन लाँच करण्यात आले.

BHIM अँप्लिकेशन फायदे .
१) तुम्ही कोणालाही कधीही पैसे पाठवू शकता.

२) ज्या दुकानामध्ये BHIM उपलब्ध असेल तेथे तुम्ही १ मिनिटाच्या आत पैसे देऊ शकता.

४) बँक मध्ये असलेले पैसे बघू शकता.

५) पैसे पाठवल्या नंतर आकर्षक बक्षिसे मिळतात.

कोणत्यापण बँकेचा IFSC कोड कसा शोधावा . 

RC आणि ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईल मध्ये कसे डाउनलोड करावे 

BHIM अँप्लिकेशन कसे डाउनलोड करावे.

१) सर्व प्रथम आपले प्ले स्टोर ओपन करा.

२) सर्च बॉक्स मध्ये BHIM असे नाव टाका.

३) आता BHIM चे अँप्लिकेशन येईल ते डाउनलोड करा. किंवा येथे क्लिक करा.

BHIM अँप्लिकेशन मध्ये बँक ऍड करण्याआधी घ्यावयाची काळजी .

१) ज्या मोबाईल नंबरला आपली बँक ऍड आहे तो नंबर आपल्याला मोबाईल मध्ये हवा.

२)  ज्या मोबाईल नंबरला आपली बँक ऍड आहे त्या सिम कार्ड मध्ये कमीत कमी २ रुपये हवेत

३) एकाच नंबरला  १ पेक्षा जास्त बँक खाते लिंक नसावे .


BHIM अँप्लिकेशन मध्ये आपले बँक खाते कसे जॉईन करावे.

१) BHIM अँप्लिकेशन ओपन करा.

२) ओपन केल्यानंतर तेथे तुम्हाला भाषा निवडायची आहे .


३) बँकेला जे सिम कार्ड लिंक आहे ते निवडा.


४) एक पासवर्ड तयार करा. आणि तो पुन्हा टाका.


५) आता तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव सिलेक्ट करायचे आहे .


६) त्यानंतर तुमच्या बॅंकेचे नाव व बँक खाते नंबराचे शेवटचे ४ अंक दिसतील ते बरोबर असतील तर त्यावर क्लिक करा.


७) आता तुमचे बँक खाते BHIM अँप्लिकेशनला लिंक झाले .

आता तुम्ही जर BHIM अँप्लिकेशन द्वारे पैसे पाठवू इच्छिता तर येथे क्लिक करा.

मला अशा आहे की , ही पोस्ट नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरली असेल व आवडली असेल .
धन्यवाद🙏🙏