कोणतीही बस ट्रॅक करा .|| Msrtc Bus Track

महाराष्ट्रातील गावांना जोडणारी लाल परी अगदी लहान मुलांपासून म्हणजेच विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सुविधा देत आपल्या माथ्यावर घेऊन फिरणारी लालपरी . तर तुम्ही लालपरीला आता तुम्ही मोबाईलद्वारे ट्रेक करू शकतात . खरच तुम्ही तुमच्या मोबाईल वरून लालपरीला ट्रॅक करू शकता.


नमस्कार मित्रांनो मी अभिजित या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ची बस तुम्ही आता मोबाईल द्वारे ट्रॅक करू शकता. ती आता कुठे आहे पुढच्या पाच मिनिटानंतर कुठे असेल , ती आपल्या स्टॉप वर कधी येईल हे तुम्ही अगदी तुमच्या मोबाईल मध्ये बघू शकतात तर मित्रांना ते कस काय बघावे त्यानंतर ती बस ट्रॅक करावी हे सर्व मी या पोस्टमध्ये सांगणार आहे तर हि पोस्ट शेवटपर्यंत वाचायला विसरू नका.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ खूप दिवसापासून तोट्यात आहे. त्याच्यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बस मध्ये जीपीएस सिस्टिम लावून अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे आपल्याला नेमकी बस कुठे आहे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

एमएसआरटीसी बस कशी ट्रॅक करावी?

१) सर्वप्रथम प्ले स्टोर वरून एमएसआरटीसी  एप्लीकेशन डाऊनलोड करा. किंवा येथे क्लिक करा .

२) आता तुम्ही बघू शकता की ह्या अँप्लिकेशन मध्ये खूप सारे ऑप्शन देण्यात आलेले आहे. 

३) ॲप्लिकेशन मध्ये देण्यात आलेली सुविधा खालील प्रमाणे

अ)  Bus Stand By near Me
         ऑप्शन मध्ये गेल्यानंतर जर तुम्ही लोकेशनला परमिशन करून दिली त्यानंतर तुमच्या जवळपास उपलब्ध असेलेलं बस स्टॉप तिथे दाखवेल.


ब) Track Bus

ट्रक बस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर बसचा नंबर माहिती असेल तर तुम्ही त्यामध्ये बसचा नंबर टाकून बस ट्रॅक करू शकता.
बसचा नंबर टाकताना फक्त शेवटचे चार अंक टाईप करायचे आहे त्यानंतर बसचा पूर्ण नंबर खाली येतो त्यावर क्लिक करायचे आहे आणि बस ऑन मॅप यावर क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही बघू शकता की, बस चा रूट काय आहे, सध्याचे बसचे लोकेशन काय आहे.

आता तुम्ही खाली बघू शकता की, तीन ऑप्शन देण्यात आलेली आहे.
i) रूट मॅप

जर रूट मॅप वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या बसचा पूर्ण रोड दिसतो. आणि त्या रूट मध्ये कोणकोणते गाव येतात तर ते तुम्ही बघू शकतात.


ii) ETA
ETA या बटनावर क्लिक केलं तर तुम्हाला दाखवेल की, पुढच्या किती वेळा मध्ये कोणत्या गावाला बस पोहोचणार आहे. किंवा तुम्ही जर एखाद्या स्टॉप वर उभे असाल तर त्या स्टॉपवर गाडी कधी येणारे आहे ते तुम्ही चेक करू शकता.

iii) शेअर ट्रेकिंग

तुम्ही जी बस ट्रॅक केली  आहे ते तुम्ही शेअर पण करू शकता व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम किंवा दुसऱ्या एप्लीकेशन वर.


तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही अगदी पाच मिनिटाच्या आत कोणती पण बस येथे ट्रॅक करू शकता

तर मित्रांनो मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर आवडला असेल तर ह्या पोस्टची लिंक सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

Post a Comment

0 Comments