Multiple Bank Account | १ व्यक्तीने किती बँक खाते उघडायला हवे ? |

बँक ही काळाची गरज बनली आहे . सर्व सरकारी कामांचा किंवा शेतकर्‍यांसाठी कोणतीही योजना असो या सर्व गोष्टींचा पैसा हा आपल्या बँक खात्यामध्येच येतो असतो . पण  सर्वात मोठा प्रश्न की , एका व्यक्तीने किती बँक मध्ये खाते उघडायला हवे .  एक की एकापेक्षा जास्त (Multiple Bank Account )  तर चला ह्या पोस्ट मध्ये हीच माहिती घेऊया .

नमस्कार मित्रांनो मी अभिजित मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की, एका व्यक्तीने बँकेमध्ये एकच खाते ओपन करायला हवे की , एका पेक्षा जास्त . जर आपले बँक खाते एक नसून एकापेक्षा जास्त असेल तर ते आपल्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानकारक हेच मी ह्या पोस्ट मध्ये सांगणार आहे तर चला हि पोस्ट शेवटपर्यंत वाचत रहा.

Multiple bank account


साधारणपणे सामान्य माणूस हा आपल्या जवळच्या बँक मध्ये खाते ओपन करत असतो. मग ती कोणतीही बँक असो. पण नोकरदार माणूस , विद्यार्थी किंवा जो सरकारी कामांमध्ये असतो तो एकापेक्षा जास्त बँक खाते वापरतो. तर चला या पोस्टमध्ये बघूया  कोणकोणते फायदे आहे व कोणकोणते तोटे आहे.



फायदे


१) एक लाख रुपयाची सिक्युरिटी


    कोणतेही बँक आपल्या खातेदाराची फक्त एक लाखापर्यंत हमी घेत असते. अशातच तुमच्याकडे जर एक लाखापेक्षा जास्त रक्कम असेल तर ती तुम्ही विविध बँक खाते मध्ये ठेवू शकता. अशाने आपल्याला आपल्या पैशाची गॅरंटी मिळून जाते.

नुकसान किंवा तोटे


क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड चार्जेस


  एकविसाव्या शतकात किंवा या आधुनिक काळात बँक आपल्याला अनेक सोयी सुविधा पुरवतात. कोणत्या सोयी सुविधा पुरवत असताना आपल्याकडून त्यांचे सर्व चार्ज सुद्धा घेतले जातात. जसे की, क्रेडिट कार्ड , डेबिट कार्ड , sms चार्ज , पासबुक चार्ज , नेट बँकिंग चार्ट चे पैसे वेगळे घेतले जातात. अशातच जर तुमच्याकडे एक किंवा एक पेक्षा जास्त बँके असतील तर प्रत्येक बँकेसाठी तुम्हाला चार्जेस द्यावे लागतील.




मेंटेनेस चार्ज


  प्रत्येक बँकेने मिनिमम अमाऊंटची सीमा ठरवले आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँकेत खाते मध्ये मिनिमम पैसे ठेवावेच लागतील. जर तुम्ही ते ठेवले नाही तर तुम्हाला मेंटेनेस चार्ज म्हणजे पेनल्टी लावले जाईल आणि तुमच्या बँक खात्यातून पैसे कट केले जातील. साधारणपणे प्रत्येक बँकेचे मिनिमम अमाऊंट हजार ते दोन हजार रुपये यामध्ये रेंज असते.

नेट बँकिंग पासवर्ड


 बँक आपल्याला खुप सोयी व सुविधा पुरवते. यामध्ये येते ते म्हणजे म्हणजे नेट बँकिंग . जर आपले अकाऊंट दोन किंवा दोनपेक्षा जास्त बँक मध्ये असेल. आणि आपण जर नेट बँकिंग वापरत असाल तर आपल्याला प्रत्येक बँकेचा नेट बँकिंग युजरनेम आणि पासवर्ड लक्षात ठेवावा लागेल. ते खूप अवघड होऊन जाईल.

 पैशाची व्यवहार


 मित्रांनो अशा खूप सार्‍या बँक आहे ज्यामध्ये आपल्याला एक महिन्यात कमीत कमी एक पैशाचे व्यवहार तरी करावा लागतो. नाही केला तर आपल्याकडून बँक चार्जेस कापते. तर त्यामध्ये जर आपले खाते बँकेमध्ये असतील तर प्रत्येक बँकेचे येथे ट्रांजेक्शन करणे अवघड होऊन जातं. पण तुम्ही जर UPI अप्लिकेशन वापरतात 
तर त्यावरून तुम्ही ट्रांजेक्शन करू शकता.

बँकेतील खाते बंद कसे करावे.


आता तुम्ही वरचे पॉईंट वाचून लक्षात आले असेल कि तुम्हाला तुमचे खाते एकच बँक मध्ये ठेवायचे आहे की एकापेक्षा जास्त .

  तुमचे बँक खाते बंद करू इच्छिता , तुम्हाला तुमच्या बँक मध्ये जाऊन अकाउंट बंद करण्याचा फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर तुमचं बँक अकाउंट बंद होऊन जाईल आणि तुम्ही त्यातील रक्कम काढून तुम्ही दुसऱ्या अकाउंट मध्ये टाकू शकता.

तर मित्रांनो मला आशा आहे की ही पोस्ट वाचून तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल. जर झाला असेल तर व्हाट्सएप  वर शेअर करायला विसरू  नका. जर काही मनात शंका असतील तर विचारायलाविसरू नका.
धन्यवाद


निष्कर्ष

आता तुम्हाला समजलेच असेल की , एक किंवा एकापेक्षा जास्त बँक (Multiple Bank Account) खाते ठेवले तर त्याचे काय फायदे आहे काय तोटे आहे . 
 जय हिंद जय महाराष्ट्र

Post a Comment

1 Comments