जिओ ट्यून कशी ऍक्टिवेट करावी . । How to activate jio caller tune

नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकलच्या एक नवीन पोस्ट मध्ये आपले सहर्ष स्वागत.
 या पोस्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की , जिओच्या सिमकार्डला कॉलर ट्यून कशी लावावी.



सध्याच्या काळात जिओने चांगलाच धुमाकूळ घातला आहे . आणि याच काळात एकापेक्षा एक चांगल्या चांगल्या ऑफर दिल्या आहे . त्यामुळे जिओ ग्राहकांचा कल जिओ ट्यून कडे जास्तच वळत आहे कारण जिओ जी सर्व्हिस अगदी मोफत देत आहे . तसेच बाकीचे ऑपरेटर ( आयडिया, व्होडाफोन , ई. ) त्यांच्या ग्राहकांकडून महिन्याचे ३५ ते ४० रुपये आकारते .

जिओ ट्यून लावण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरून जिओ सावन डाउनलोड करावे लागेल.

जिओ सावन अँप डाउनलोड कसे करावे.

१) सर्वप्रथम प्ले स्टोर ओपन करा .

२) वर सर्च बॉक्स दिसेल त्यामध्ये JIO SAAVN हे नाव टाका आणि सर्च करा. किंवा येथे क्लिक करा.

३) आता तुम्हाला JIO चे अँप्लिकेशन दिसू लागेल ते डाउनलोड करा.

जिओच्या नंबरला जिओ ट्यून कशी लावावी.

१) सर्वप्रथम जिओ सावन अँप्लिकेशन डाउनलोड करा.

२) तेथे तुम्हाला अनेक भाषा दिसतील त्यामधून तुम्हाला हव्या असणाऱ्या भाषा निवडा.


३) आता खाली एक सर्चचे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.

४) तुम्हाला हवे असणारे गाण्याचे नाव टाकून सर्च करा.

५) प्ले बटनावर क्लिक करा.

६) त्यानंतर set jio tune या बटनावर क्लिक करा . व १५ मिनिटांच्या आता तुमची ट्यून तुमच्या मोबाईलला वाजू लागेल.

तसेच तुम्ही जिओ सावन या अँप्लिकेशन चा गाणे ऐकण्यासाठी पण वापर करू शकता.

मला आशा आहे की , ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. 

Post a Comment

0 Comments