खूप वेळा असे होते की काही कारणास्तव आपल्याला एखादा विडिओ  फाईल चे कन्व्हर्ट ऑडिओ फाईल मध्ये करावे लागते .कॉम्पुटर साठी खूप असे अँप्लिकेशन आहेत ज्याने तुम्ही हे काम अगदी काही वेळातच करू शकता.पण आताच्या काळात मोबाईल हे कॉम्प्युटर पेक्षा खूप वाढले आहेत आणि त्यासाठी सुद्धा खूप अँप्लिकेशन बनवण्यात आले आहेत.पण असे मुळीच नाही की , सर्वच अँप्लिकेशन येथे चांगल्या पध्दतीने आपले काम करेन . त्यामुळे आपल्याला नेमके चांगले अँप्लिकेशन येथे मिळत नाही . तर ह्या पोस्ट मध्ये मी हेच सांगणार आहे . तुम्ही प्ले स्टोरे लोकप्रिय अँप्लिकेशन डाउनलोड करून एखाद्या विडिओ फाईल चे कन्व्हर्ट  ऑडिओ  मध्ये कसे करु शकता.

Video



 तुम्हाला विडिओ फाईल चे कन्व्हर्ट जर ऑडिओ फाईल मध्ये करायचे असतील तर एक अँप्लिकेशन येथे डाउनलोड करावे लागेल.गूगल प्ले स्टोर खूप अँप्लिकेशन आहेत.पण विडिओ चे कन्व्हर्ट ऑडिओ फाईल मध्ये करण्यासाठी एक लोकप्रिय अँप्लिकेशन आहे . त्याची रेटिंग 4.6 तर डाउनलोड 10 लाख + आहेत .ह्यामुळेच आपल्याला कळते की हे अँप्लिकेशन किती लोकप्रिय आहे .

 अँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Video to MP3 converter app डाउनलोड केल्यानंतर हे अँप्लिकेशन ओपन करायचे आहे .

आता VIDEO TO AUDIO या बटनावर क्लिक करा.



 आता तुमच्या मोबाईल मधील सर्व फाईल येथे ओपन होऊन जातील. तुम्हाला अशी फाईल ओपन करायची आहे .ज्यामध्ये तुम्हाचा विडिओ  असेल.


आता तुम्हाला येथे तो विडिओ ऍड करायचा आहे जो की त्याची ऑडिओ फाईल बनवायची आहे.



विडिओ सिलेक्ट केल्यानंतर खाली काही ऑप्शन मिळतील त्यामध्ये mode मध्ये simple आणि format मध्ये mp3 असे सिलेक्ट करायचे आहे.आता खाली एक convert चे बटन मिळेल त्यावर क्लिक करायचे आहे.



जसे तुम्ही कन्व्हर्ट या बटनावर क्लिक कराल. त्याचवेळेस विडिओ चे कन्व्हर्ट ऑडिओ मध्ये होण्यास सुरुवात होईल. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर प्ले या बटनावर क्लिक करून तुम्ही तो ऑडिओ पण ऐकू शकता. आता तुम्ही चेक करू शकता की ऑडिओ चांगल्या पद्धतीमध्ये कन्व्हर्ट झाला आहे की नाही.

अश्या पध्दतीने तुम्ही कोणता पण विडिओ चे कन्व्हर्ट ऑडिओ मध्ये करू शकता.

मला आशा आहे की, तुम्हाला ही सर्व माहिती नक्कीच कळाली असेल जर काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला खाली कंमेंट बॉक्स तुमचा प्रश्न लिहून  आम्हाला पाठवू शकता.

 ही माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.