लाईट बिलाची पावती डाउनलोड कशी करावी . | Download Light Bill Receipt

नमस्कार मित्रानो मराठी टेक्निकल या वेबसाईट मध्ये सहर्ष स्वागत. या पोस्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कि , तुम्ही इलेक्ट्रिसिटी लाईट बिलाची पावती  कशी काय डाउनलोड करू शकता . तर या साठी हि पोस्ट शेवट पर्यंत वाचत रहा .


light bill marathi

कोणत्या लाईट बिलाची पावती डाऊनलोड करू शकतो . 


       जर तुम्ही तुमचे लाईट बिल ऑनलाईन  भरले असेल तर तुम्ही ती पावती डाउनलोड करू शकता . आणि तुम्ही तुमचे लाईट बिल लाईट बिल भरणा केंद्रावर जाऊन भरले असेल तर तुम्हाला पावती डाउनलोड करता येत नाही . ऑनलाईन म्हणजेच paytm , phone pe , google pay , अशा वॉलेट मधून भरले असेल तर .


ऑनलाईन भरलेल्या लाईट बिलाची पावती कशी डाउनलोड करावी . 


१) सर्वप्रथम येथे क्लिक करा 

२) आता तुमच्या पुढे एक नवीन विंडो ओपन झालेली असेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक , बिलिंग युनिट ( जे तुमच्या बिलावर असते ) , आणि कॅप्चा भरायचा आहे . आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.

mahadiscom view and pay bill


३) आता खाली view History  या बटनावर क्लीक करायचे आहे .

४) त्यांनतर Payment History या बटनावर क्लीक करायचे आहे .

mahadiscom payment history


५) यामध्ये आता  अनेक मागच्या बिलाचे भरलेले पैसे , त्यांचे दिनांक दिसू लागतील , जर तुम्ही Netbanking, Debit/ Credit Card , Mobail Wallet , UPI द्वारे पैसे भरलेले असतील ते दिसू लागती व त्याची पावती तुम्ही डाउनलोड करू शकता .

६) आता तुम्हाला पुढे e चे बटन दिसेल त्यावर क्लीक करून पावती डाउनलोड करू शकता .



अशा पद्धतीने तुम्ही लाईट बिलाची पावती PDF मध्ये डाउनलोड करू शकता किंवा त्यांची प्रिंट सुद्धा करू शकता .



➤हे वाचायला विसरू नका .


    १) गूगल पे द्वारे लाईट बिल कसे भरावे .




Post a Comment

1 Comments