व्हाट्सएप मध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी व्हाट्सएप ने अनेक नवीन नवीन अपडेट आणले आहे.त्यामध्ये एक फिचर आहे ते म्हणजे 2 स्टेप्स व्हेरिफिकेशन . ते ऑपशन एनेबल करून तुम्ही तुमच्या व्हाट्सएपच्या अकाउंटची सुरक्षा वाढवू शकता. टू स्टेप्स व्हेरिफिकेशन एनेबल करण्यासाठी सहा अंकाचा पासकोड ठेवावा लागतो.



आधी व्हाट्सअप्पमधून डेटा चोरी होईल याची भीती होती. आणि कोणी तुमचे पर्सनल फोटो, मॅसेज, व्हिडिओ पाहू शकत होते.पण जर तुम्ही टू स्टेप्स व्हेरिफिकेशन एनेबल केले तर तुमचे अकाउंट हॅक होणार नाही. तुम्ही जेव्हा 2 स्टेप्स व्हेरिफिकेशन  एनेबल कराल त्याच वेळेस तुम्हाला ई-मेल विचारला जाईल. तेथे तुम्ही तुमचा ई-मेल आयडी टाकून द्यायचा आहे जेणेकरून जर कधी तुम्ही 6 अंकाचा पासकोड विसरला तर तो तुम्ही परत मिळवू शकता.

 व्हाट्सएप वर 2 स्टेप्स व्हेरिफिकेशन कसे एनेबल कसे करावे. स्टेप्स बाय स्टेप्स माहिती.


व्हिडिओचे कन्व्हर्ट ऑडिओ फाईल मध्ये कसे करावे.

   फेसबुक मध्ये 2 स्टेप्स व्हेरिफिकेशन कसे एनेबल करावे.

स्टेप्स १-
सर्वात आधी तुमच्या मोबाईल मधील व्हाट्सएप ओपन करा.

व्हाट्सएपच्या सेटिंग मध्ये जा.आणि अकाउंट वर क्लिक करा. आता तुम्हाला तेथे two step verification असे लिहलेले असेल.त्यावर क्लिक करायचे आहे .


आता एनेबल वर क्लिक करा.

 स्टेप्स 2

एनेबल वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर मागितला जाईल.

तर मोबाईल नंबर ऍड करून द्या. आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकाचा पासकोड येईल तो ऍड करून द्या. या नंतर तुमचे 2 स्टेप्स व्हेरिफिकेशन ऍक्टिव्ह होऊन जाईल . पण तुम्ही येथे तुमचा ई-मेल आयडी सुद्धा येथे ऍड करून द्या. जेणेकरून जर तुम्ही तुमचा पासकोड विसरलात तर तुम्ही तुमच्या ई-मेल आयडी द्वारे तो परत घेऊ शकता. आता done या बटनावर क्लिक करा.

आता , जेव्हा तुम्ही  व्हाट्सएप चे नवीन मोबाईलमध्ये अकाउंट ओपन कराल त्या वेळेस तुम्हाला हा पासकोड विचारला जाईल. जर तो तुम्ही विसरला असाल तर ई-मेल आयडी द्वारे तुम्ही परत घेऊ शकता.



अशा पध्दतीने तुम्ही व्हाट्सएप वर 2 स्टेप्स व्हेरिफिकेशन एनेबल करू शकता.

मला आशा आहे की , ही पोस्ट वाचून तुम्हाला नकीच फायदा झाला असेल , तर ही पोस्ट मित्रांबरोबर नक्की शेअर करा. काही समस्या असेल , खाली कंमेंट बॉक्स आहे त्यामध्ये तुमचा प्रश्न लिहून आम्हाला पाठवा. धन्यवाद 👏👏👏