जगातील सर्वात लोकप्रिय असलेलं मेसेजिंग अॅप म्हणजेच व्हाट्सअप नेहमी आपल्या नवीन नवीन अपडेट साठी चर्चेचा विषय बनलेला असतो. व खूप खूप वेळेपासून डार्क मोड या फीचरची व्हाट्सअपच्या वापरकर्त्यांना प्रतीक्षा होती. तर ते व्हाट्सअप ने प्लेस्टोर वर अपडेट करून दिलेले आहे. तर मित्रांनो तुम्हीसुद्धा डार्क मोडची वाट बघत असाल तरी ही पोस्ट तुमच्यासाठी. मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही व्हाट्सअप अपडेट करणार आणि कशापद्धतीने व्हाट्सअप मध्ये डार्क मोड अनेबल करावा.



         जर आपण विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर डायरेक्ट मोड हे आपल्या मोबाईल मध्ये असणे गरजेच आहे याचे फायदे असे की एक आपल्या मोबाईलची बॅटरी वाचते. व आपल्या डोळ्यांना जास्त त्रास होत नाही. तसेच आताच्या काळात जवळपास सर्वच अँड्रॉइड ॲप्लिकेशन किंवा आयफोनचे ॲप्लिकेशन आहे यांना डार्क मोड देण्यात येत आहे काही ॲप्लिकेशन मध्ये डार्क मोड देण्यात आलेल्या आहे तर काही ॲप्लिकेशन मध्ये काम चालू आहे. आता अँड्रॉइड १० मध्ये अशी सुविधा देण्यात आलेले आहे की जर तुम्ही फोन मध्ये दडार्क मोड अनेबल केला तर मोबाईल मध्ये असलेल्या सर्व एप्लीकेशन मध्ये डार्क मोड ऑटोमॅटिक अपडेट होऊन जातो. पण काही मोबाईल मध्ये आता सध्या अँड्रॉइड १० वर्जन देण्यात नाही आलेले त्यामुळे तुम्ही ज्या ॲप्लिकेशन मध्ये डार्क मोड किंवा डार्क थीम ही अप्लाय करून घ्या.

व्हाट्सअप अपडेट कसे करावे.


   जेव्हा कधी व्हाट्सअप आपला नवीन अपडेट देतो त्यावेळेस ते अपडेट सर्व लोकांसाठी दिलं जात नाही. ते काही बीटा युजर असतात त्यांनाच दिले जाते. त्यामुळे जर तुम्ही अपडेट भेटलेले नसेल तर तुम्हाला ते काही वेळा नंतर अपडेट देण्यात येईल. पण ते सर्वांसाठी देण्यात येईल.

    व्हॉट्सऍप अपडेट करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअर वर जाऊन व्हाट्सअप सर्च करून सुद्धा अपडेट करू शकता किंवा येथे क्लिक  करून तुम्ही व्हाट्सअप अपडेट करू शकता.

व्हाट्सअप मध्ये डार्क मोड अनेबल कसे  करावे .


1) सर्वप्रथम व्हाट्सअप मध्ये असलेल्या तीन उभ्या बिंदूंवर क्लिक करा.

2) त्यानंतर सेटिंग या बटनावर क्लिक करुन चॅट सेक्शन वर क्लिक करा.


3)आता तुम्हाला थीमच्या सेक्शनमध्ये डार्क हे मोड निवडा.

4) व्हाट्सएप बंद करून पुन्हा चालू करा.

आता तुम्ही बघू शकता की व्हाट्सअप मध्ये डार्क मोड चालू  झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये अगदी पाच मिनिटाच्या आत डार्क मोड अनेबल करू शकता.

मला आशा आहे की ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर सोशल मीडियावर लिंक शेअर करायला विसरू नका.


जर तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट स्नॅपडील साइटवरून शॉपिंग करत असाल आणि त्यावर दररोज डिस्काउंट मिळू इच्छिता तर आता आमच्या व्हाट्सअपला जॉईन व्हा.

व्हाट्सएपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

जय हिंद जय महाराष्ट्र