नमस्कार मी अभिजित ..तुमचे मराठी टेक्निकल या वेबसाईट वर स्वागत आहे . या पोस्ट मध्ये मी सांगणार आहे कि , तुम्ही ऑनलाईन ७/१२ उतारा कसा काढू शकता यासाठी हि पोस्ट शेवट पपर्यंत वाचत रहा .


download 7/12



    शेतकरी व शेतीसाठी असलेला महत्वाचा कागदपत्र म्हणजे ७/१२ उतारा . तर मित्रानो आता तुम्ही घरी बसल्या फक्त १५ रुपयात ७/१२ उत्तर काढू शकता . आदी सुद्धा ऑनलाईन ७/१२ मिळत होता पण तो आपल्याला शासकीय कामांसाठी वापरता येत नव्हता . पण आता असं नाही तुम्ही अगदी पाच मिनिटांत ७/१२ काढू शकता आणि त्याचा वापर शासकीय कामांसाठी पण करू शकता तर चला बघूया.....


७/१२ उतारा डाउनलोड कसा करावा . 


१) सर्वप्रथम येथे क्लिक करा . 

२)  New User Registation  या बटनावर क्लिक करा .



३) आता  तुमच्या पुढे एक फॉर्म येईल तो फॉर्म भरा .

    ज्यामध्ये नाव,लिंग,मोबाईल नं . , ई-मेल आयडी , जन्म तारीख , पत्ता , टाकायचे आहे ,

खाली तुम्हाला तुमची लॉगिन आयडी निवडायची आहे त्यांनतर पासवर्ड आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे .



४) आता तुम्हाला   तोच लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करायचे आहे.

५) आता आपल्याला प्रत्येक ७/१२ काढण्यासाठी १५ रुपये शुल्क द्यावे लागेल . त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पैसे ऍड करावे लागतील .

६) Recharge Account या बटनावर क्लिक करा .



७) आता तुम्हाला जितके पैसे ऍड करायचे असतील तितकी रक्कम टाका .  तुम्ही कमीत कमी १५ रु. व जास्तीत जास्त १०००रु. ऍड करू शकता .



८) आता तुमच्या डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / एटीएम कार्ड चा नंबर टाकून पैसे ऍड  करू शकता .  जर तुमच्या कडे इंटरनेट बँकिंग असेल तर त्याद्वारे सुद्धा पैसे ऍड करू शकता .

९) पैसे ऍड झाल्यांनतर Digitally  Singed ७/१२ यांवर क्लिक करा .

१०) आता तुम्हाला जिल्हा , तालुका , गाव निवडायचे आहे . आणि गट नंबर टाकायचा आहे .



११) आणि डाउनलोड या बटनावर क्लिक करायचे आहे .


डाउनलोड केल्यांनतर तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता .

तर अश्या पद्धतीने तुम्ही अगदी काही मिनिटात ७/१२ उतारा काढू शकता .   जय हिंद , जय महाराष्ट्र 


अधिक माहितीसाठी आमचा युट्युब वरील विडिओ बघा , विडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा .