नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल या वेबसाईट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की, तुम्ही डिजीलॉकर चा पासवर्ड तसेच  युजरनेम कसे काय  बदलू शकता? त्यासाठी ही पोस्ट  शेवटपर्यंत वाचत रहा.


डिजिलॉकर  मध्ये आपल्याला सरकारकडून किंवा अनेक शाळा कॉलेजेस त्यानंतर अनेक संस्था यांच्याकडून आपल्याला डॉक्युमेंट दिले जातात असे की आपल्या शाळेचा दाखला उत्पन्नाचा दाखला त्यानंतर जातीचा दाखला असे दाखले तुम्हाला तुमच्या आधार कार्ड द्वारे दिली जातात तर ते कागदपत्रे ते ऑटोमॅटिक तुमच्या
डिजिलॉकर मध्ये येऊन जातात तसेच जर तुमच्याकडून एखादे डाकुमेंट हरवले तर तुम्ही
डिजिलॉकर मधून ते डाऊनलोड करू शकतात तर यामध्ये तुम्ही तसेच डीजे लॉकर मध्ये लॉग इन करण्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन दिलेले असतात ज्यामध्ये पहिले ऑप्शन असते ते म्हणजे युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता सोबत तुमच्या आधार कार्ड असतो आधार कार्ड नंबर टाकून त्यानंतर आधार कार्डला जो  मोबाइल नंबर लिंक असेल त्या नंबर वर ओटोपी येतो तो टाकून तुम्ही
डिजिलॉकर  मध्ये लॉगिन करू शकतात पण जर तुम्ही युजरनेम आणि पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही तो रिकव्हर म्हणजेच परत घेऊ शकतात तर ते कस काय करायचे यासाठी पोस्ट वाचत रहा.



डिजिलॉकरचा युजर नेम विसरला असेल तर परत कसा घ्यावा?


1) सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


डिजिलॉकरच्या वेबसाइट जाण्यासाठी येथे क्लिक करा . 

2) त्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला साइन-इन बटण दिसेल त्यावर क्लिक करा.



3) आता लाल अक्षरांमध्ये तुम्हाला फोरगेट  युजरनेम   दिसेल त्यावर क्लिक करा.





4) आता तुम्हाला येथे दोन ऑप्शन मिळतील ज्यामध्ये पहिला ऑप्शन असेल  आधार यूजर आणि दुसरा ऑप्शन असेल नोन आधार यूजर   जर तुम्ही तुमचे आधार कार्ड डिजीलॉकर  \लींक केलेला असेल तुम्ही पहिला ऑप्शन निवडा किंवा जर तुम्ही तुमच्या आधार कार्ड डिजीलॉकरला लिंक केलेले नसेल तर दुसरा ऑप्शन निवडा.



5) आता माझे आधार कार्ड डिजीलॉकरला लिंक  आहे त्यामुळे मी  पहिले ऑप्शन निवडतो. आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओटीपी   टाकायचा आहे. आणि व्हेरिफाय या बटणावर क्लिक करून द्यायचे.



6) आता  तुमच्यासमोर तुमचा युजर नेम दिसू लागेल मी सेव्ह करून ठेवू शकता.



डिजिलॉकरचा पासवर्ड विसरला असाल तर तो तुम्ही कस काय बदलू शकता.

1) आता तुम्हाला forget  पासवर्ड या बटनावर क्लिक करायचे आहे.

2) तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि मोबाईल नंबरला एक ओटीपी येईल तो तिथे टाकायचा आणि व्हेरिफाय करायचा आहे.



3) त्यानंतर जर तुमचे आधार कार्ड डिजीलॉकरला लिंक असेल तर तुम्हाला तुमचा कार्ड नंबर टाकायचा आणि आधार कार्ड नंबर ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओटीपी तो तेथे टाकून व्हेरिफाय  करायचा आहे.



4) आता तुम्हाला एक नवीन विंडो दिसू लागेल त्यामध्ये तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून सबमिट या बटणावर क्लिक करून द्या.




तर अशा पद्धतीने तुम्ही डीजे लॉकर मध्ये युजर नेम आणि पासवर्ड परत घेऊ शकतात .

अधिक माहितीसाठी यूट्यूबवर विडिओ बघा .