नमस्कार मित्रांनो मराठी टेक्निकल  या वेबसाईटमध्ये तुमचे  सहर्ष स्वागत. या पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कोणत्या पण पीडीएफला पासवर्ड कसा काय लावू शकता.



पीडीएफला पासवर्ड टाकण्यासाठी यासाठी आपल्याकडे खूप ऑनलाईन किंवा ऑफलाईन सॉफ्टवेअर किंवा टूल उपलब्ध आहे. ऑफलाइन सॉफ्टवेअर डाऊनलोड केले तर त्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. किंवा काही सॉफ्टवेअर फ्री सुद्धा  असू शकतात. शक्यतो लॅपटॉप किंवा पीसीसाठी जे सॉफ्टवेअर डाऊनलोड करतो त्यांच्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात पण जर आपण मोबाईलसाठी डाउनलोड केले तर आपल्याला पैसे द्यावे लागत नाही. किंवा आपल्याकडे ऑनलाइनकाही टूल उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पीडीएफ आपला पासवर्ड लावू शकता. तर मी अशाच एका ऑनलाइन टूल विषयी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो  ही पोस्ट तुम्ही शेवटपर्यंत वाचत रहा.

पीडीएफला पासवर्ड कसा काय लावावा.

१ ) सर्वप्रथम स्मॉल पीडीएफ डॉट कॉम या वेबसाईटवर जा.

स्मॉल पीडीएफ डॉट कॉम या वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

२)तुम्हाला प्रोटेक्ट पीडीएफ या बटनावर क्लिक करायचे आहे.



३ ) तुम्हाला ज्या पीडीएफला पासवर्ड टाकायचं असेल ती पीडीएफ upload' करा अपलोड करा .




४ ) आता तुम्हाला जो पासवर्ड टाकायचा असेल तर तिथे टाइप करा. एंक्रीप्ट पीडीएफ बटणावर क्लिक करून द्या




५) आता तुमच्या पीडीएफला पासवर्ड लागलेला आहे तुम्ही ती पीडीएफ डाऊनलोड करू शकतात. डाउनलोड या बटणावर क्लिक करून तुम्ही ती पीडीएफ डाऊनलोड करून घ्या.



तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्या पण पीडीएफ आपला पासवर्ड लावू शकता.

मला आशा ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर आवडली असेल तर या पोस्टची लिंक सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.

अधिक माहितीसाठी  व्हिडीओ बघा